बजाज नगर येथील दत्त मंदिरात भव्य आरोग्य तपासणी नेत्र तपासणी रक्तदान शिबिर व कॅन्सर मुक्त महाराष्ट्र
आज जयंती निमित्त बजाज नगर येथील दत्त मंदिरात भव्य आरोग्य तपासणी नेत्र तपासणी रक्तदान शिबिर व कॅन्सर मुक्त महाराष्ट्र जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला यावेळी 300 पेशंटची तपासणी करण्यात आली व गरजूंना चष्मे वाटप करण्यात आले तसेच बीपी शुगर व रक्तदान शिबिर घेण्यात आले यावेळी आरोग्य कीर्तनकार डॉक्टर संकपाळ एमडी बाबा हिंदुस्तानी फुलंब्रीकर यांनी आपल्या आरोग्य कीर्तनातून जनजागृती केली सर्व रोगाविषयी सखोल माहिती दिली त्याचप्रमाणे आरोग्य जागृती असोसिएट तर्फे कॅन्सर मुक्त महाराष्ट्र या कॅन्सर विषयी सर्व माहिती दिली उपचार त्याचप्रमाणे घ्यावयाची काळजी शस्त्रक्रियेसाठी सरकारी मदत कशी घ्यायची याविषयी माहिती दिली शेवटी महाप्रसाद झाला आणि सर्वांनी महाप्रसाद घेऊन कार्यक्रमाचे शांत झाली एकता मित्र मंडळ तर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता कमिटीच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केलं आणि हा कार्यक्रम यशस्वी झाला यावेळी डॉक्टर संकपाळ एमडी यांना मुंदडा नेत्रालयाचे डॉक्टर नेत्र चिकित्सा अधिकारी योगेश बादले तसेच धनंजय शिंदे यांनी मदत केले धन्यवाद जयहरी जयदत्त
What's Your Reaction?






