जागतिक एड्स विरोधी दिनानिमित्त जनजागृती रॅली संपन्न
जागतिक एड्स विरोधी दिनानिमित्त जनजागृती रॅली संपन्न. आज दिनांक 2 12 2024 रोजी जागतिक एड्स विरोधी दिनानिमित्त जनजागृती रॅली क्रांती चौक पासून माननीय जिल्हाधिकारी स्वामी यांच्या करकमलाद्वारे हिरवे झेंडे दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे सर डी एच ओ डॉक्टर धानोरकर सर डॉक्टर डकले मॅडम अतिरिक्त सिविल सर्जन डॉक्टर पद्मजा सराफ मॅडम हे प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते या रॅलीचे आयोजन जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कार्यालय चिकलठाणा व जिल्हा रुग्णालय चिकलठाणा छत्रपती संभाजी नगर तसेच सर्व शाळा कॉलेज व विविध संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. मराठवाडा सांस्कृतिक मंडळ खडकेश्वर येथे या रॅलीचा समारोप झाला. यावेळी डॉक्टर संकपाळ एमडी बाबा हिंदुस्तानी फुलंब्रीकर यांनी आपल्या आरोग्य कीर्तनातून एड्स या रोगाविषयी सविस्तर जनजागृती केली त्यांना मदन बीमरोट व संच यांनी साथ संगत केली यावेळी अनेक महाविद्यालयाच्या विद्यार्थी यांनी पथनाट्य व भारुडे सादर करून जनजागृती केली डॉक्टर संकपाळ एमडी हे 1988 पासून सतत आपल्या वैद्यकीय सेवेबरोबर एड्स या रोगाविषयी जनजागृती करीत आहे त्याबद्दल सर्व मान्यवरांनी कौतुक करून अभिनंदन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डीपी ओ साधना गंगावणे मॅडम काळे सर व सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रमाची सांगता झाली.

What's Your Reaction?






