औरंगाबाद रेल्वे स्टेशन येथील लोहमार्ग पोलीस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे एका महिलाचे वाचवले प्राण

औरंगाबाद रेल्वे स्टेशन येथील लोहमार्ग पोलीस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे एका महिलाचे वाचवले प्राण. समाजसेवक मुसाखान व अशरफ खान यांनी दोघे पोलीस कर्मचाऱ्यांचे केले अभिनंदन औरंगाबाद- आज 12 फरवरी रोजी औरंगाबाद रेल्वे स्टेशन येथे लोहमार्ग पोलीस कर्मचाऱ्यांची नियमितपणे चालू असताना गाडी क्रमांक १२०७२ शताब्दी एक्सप्रेस हे मुंबईकडे जात असताना हज - उमरा यात्रेसाठी औरंगाबाद येथून जनशताब्दी एक्सप्रेस मध्ये आपल्या मुलाला पवित्र हज उमर्यासाठी श्रीमती बानोबी शेख रशीद या महिला सोडन्यासाठी आल्या होत्या अचानक जनशताब्दी एक्सप्रेस सुरू झाली सदर महिला गाडीमध्येच राहिला होता घाई गडबड करीत उतरण्याच्या प्रयत्न करीत असताना झोकखाली झाल्याने ते ट्रेन खाली जात असताना लोहमार्ग पोलीस कर्मचारी अमलदार ज्ञानेश्वर शिरसागर, अश्रुबा गेजगे यांनी सतर्कता दाखवून धावत ट्रेन खाली जात असताना बाहेर खेचल्यामुळे महिलेचे प्राण वाचवले आहे. तसेच श्रीमती बानोबी शेख रशीद यांना काहीही दुखापत झालेली नाही त्यानंतर पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर शिरसागर, अश्रुबा गेजगे या पोलीस कर्मचाऱ्यांनी श्रीमती बनोबी त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले. रेल्वे स्टेशन येथील समाजसेवक मुसाखान व अरफ खान यांनी लोहमार्ग पोलीस अमलदार ज्ञानेश्वर शिरसागर व अश्रुबा गेजगे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलेले आहे. यावेळी लोहमार्ग पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या उपस्थितीत दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ मुसा खान व अशरफ खान देऊन अभिनंदन केलेले आहे. पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर शिरसागर यांनी सांगितले की, आम्ही सकाळी नऊ वाजता रेल्वे स्टेशन येथे ड्युटी करत असताना आली होती श्रीमती बानोबी शेख रशीद हे आपल्या परिवारासह आपल्या मुलाला हज उमरासाठी जाणाऱ्या रेल्वे स्टेशनला सोडण्यात आले होते. परंतु ते गाडीमध्ये होते गाडीमध्ये असतात गाडी सुरू झाली घाई गडबडीत ते खाली उतरताना त्यांचा बॅलन्स आऊट झाला होता त्यामुळे ते खाली पडले आमची नजर पडताच आम्ही तिथे धावत जाऊन गाडी खाली जात असतं असलेल्या महिलेला आम्ही त्याचे प्राण वाचवले आहे. अतिशय आनंद होत असून आमच्याकडून हे चांगला काम झालेला आहे. अशी यावेळी प्रतिक्रिया अमलदार ज्ञानेश्वर शिरसागर यांनी सांगितलेले आहे. यावेळी पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी सर्वप्रथम आपले दोघेही पोलीस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले जोगदंड यांनी सर्व प्रवाशांना आवाहन केले आहे. की, वेळे अगोदर रेल्वे स्टेशनवर यावे नातेवाईकांना सोन्यासाठी आलेल्या व्यक्तींनी गाडी निघण्याच्या अगोदरच खाली उतरणे आवश्यक आहे. रेल्वे गाडी हे रोजच येत असते परंतु आपले गेलेले प्राण परत येणार नाही. या दोघांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून यावेळी मुसाखान व अशरफ खान यांनी ज्ञानेश्वर शिरसागर आश्रूबा गेजगे, पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलेले आहे.

Feb 13, 2025 - 01:10
 0
1 / 1

1.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

Er.M.A. Shakeel Senior Journalist,Social and Political activist Sportsman,Singer.District VicePresident Human Right Council of India.